बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काहीही न करता पैसे कसे कमवतो?”; राज कुंद्राच्या अटकेनंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

मुंबई | उद्योगपती राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा हा या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता ‘द कपिल शर्मा’ शोमधील राजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

कॉमेडीयन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये राजने त्याची पत्नी शिल्पा शेट्टी आणि मेव्हणी शमिता शेट्टीसोबत हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्मानं राजला मजेशीर प्रश्न विचारले होते. कपिलनं विचारलं की, तू नेहमीच कुठे ना कुठे फिरताना दिसतो, मग काहीही न करता पैसे कसे कमावतो?. कपिलच्या या प्रश्नानंतर जमलेल्यांना हसू आवरलं नाही. पण राजला अटक झाल्यानंतर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

कपिलच्या या प्रश्नावर शिल्पानं राजची बाजू सावरत तो खूप मेहनत घेत असल्याचं सांगितलं. तिच्या या उत्तरानं स्वत: राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला देखील हसू आवरणं कठीण झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावरही अनेक मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

दरम्यान, आज मंगळवारी कुंद्राला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळं राज कुंद्राला अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. आता या प्रकरणी अजून किती रहस्य समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“मोगॅम्बोचा आव आणणारे अनिल देशमुख आता मिस्टर इंडिया झालेत”

“…तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोटांगण घातलं असतं”

शिल्पा शेट्टीचा पती प्रसिद्ध अभिनेत्रीला घेऊन कसा बनवायचा अश्लील चित्रपट?, पाहा आरोप

‘मी 5 वेळा मोबाईल बदलला पण…’; प्रशांत किशोर यांचा धक्कादायक आरोप

कोरोना लसीचं आता लय टेंशन घेऊ नका, कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More