“केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती भाजपवाल्यांना कशी मिळते?”, सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल
उस्मानाबाद | राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राजकीय सुडबुद्धीने कारवाया करण्यात येतात, असा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे. केंद्र सरकार अन्याय करत आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना कारण नसताना आत टाकण्यात आले. अनिल परबांनी परवा सर्व आरोपांची उत्तर दिली आहेत. सीबीआय ही एक स्वायत्त संस्था असताना त्यासंदर्भात कारवाईची माहिती भाजपवाल्यांना आधीच कशी मिळते?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
मी संसदेमध्ये या आधीही विचारलं आहे, आता देखील अमित शहांना विचारणार आहे की, तुमचं सरकार पारदर्शक आहे मग हे होतच कसं?, असं सुप्रिया सुळे यांनी म्हणाल्या आहेत. भाजपवाल्यांनी रोज उठायचं आणि घोटाळ्यावर बोलायचं ही आजकालची फॅशन झाली आहे, असाही टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 19 बंगले असल्याचे आरोप केले होते. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावला आहे. मला त्या आरोपांची गंमत वाटते. मुख्यमंत्र्यांवर 19 बंगल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु, एकही बंगला निघाला नाही. आरोप करणाऱ्यांची विश्वासार्हता किती आहे?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर
आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल; राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
“आमच्या बापाची बदनामी होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही”
मोठी बातमी! राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल, ‘हे’ कारण आलं समोर
‘भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली’; नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र
Comments are closed.