महाराष्ट्र मुंबई

‘…तर काँग्रेसला खूश केलं असतं’; कंगणा राणावतची उर्मिला मातोंडकरांवर बोचरी टीका

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

उर्मिला यांनी मुंबईच्या खार पश्चिम परिसरातील लिकिंग रोड परिसरात आपल्या कार्यालयासाठी जागा खरेदी केली आहे. यावरून कंगणाने उर्मिला यांना लक्ष्य केलं आहे.

प्रिय उर्मिला मातोंडकरजी, मी स्वत:च्या कष्टाने जे घर बनवले, ते सुद्धा काँग्रेस तोडत आहे. खरोखर भाजपला खुश करून मी काय मिळवले तर 25-30 केसेस. मी सुद्धा तुमच्यासारखी समजदार असते तर काँग्रेसला खूश केलं असतं. किती मूर्ख आहे ना मी?, असं ट्विट कंगणाने केलं आहे.

कंगणाने एक मीमही शेअर केले आहे. कंगणाच्या चाहत्यांनी हे मीम तयार केलं आहे. यात कंगणा व उर्मिला यांच्यातील ‘वॉर’ला मनोरंजक टच देण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘हा हा हा’ असं कॅप्शन कंगणाने दिलं आहे.

 


थोडक्यात बातम्या

भिवंडीतील शिवसेना शाखा प्रमुखावर अज्ञातांकडून गोळीबार!

‘वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा’; नितेश राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

‘ठाकरे सरकारचा सम्राट अशोक कालीन गुंफेचा बिल्डरांशी सौदा करण्याचा घाट”

कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर नरेंद्र मोदी म्हणाले…’देश आत्मनिर्भर होतोय

“नाणारच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देणार, जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार रद्द करणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या