बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एलपीजी गॅस वापरताय तर तुम्हालाही मिळणार 50 लाखांचा विमा, कसं ते वाचा सविस्तर

नवी दिल्ली | घरगुती गॅसचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. त्यामुळे खुप सतर्कतेने घरगुती गॅसचा वापर करावा लागतो. मात्र तुमच्या आसपास जर अशी गॅससंदर्भात दुर्घटना घडली असेल तर यासंदर्भात मिळणाऱ्या आर्थिक मदतीबद्दल तुम्हाला माहिती हवी.

एलपीजीचे कनेक्शन घेतल्यास कंपनी ग्राहकांना त्यासोबत ॲक्सीडेंट कव्हरही उपलब्ध करून देते. ज्यामुळे ग्राहकांना गॅस लिकेज किंवा स्फोट झाल्यास 50 लाखांपर्यंतचा इन्श्युरन्स मिळू शकतो. गॅस दुर्घटनेत ग्राहकाचे आर्थिक नुकसान झाले तर त्या बदल्यात 2 लाख रुपये मदत कंपनी देत असते. तर दुर्घटनेमध्ये कुटूंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 10 लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.

तर अशी दुर्घटना घडल्यास इन्श्युरन्स क्लेम करण्यासाठी त्या ग्राहकाला सर्वात आधी तेथील जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर जेथून तुम्ही गॅस कनेक्शन घेतलं त्या वितरकाला घटनेची माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर ग्राहकाला घटनेची एफआयआरची कॉपी, जखमींच्या उपचाराच्या पावत्या, मेडीकल बिल आणि दुर्देवाने घटनेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा पोस्ट माॅर्टम रिपोर्ट जपून ठेवावे लागणार आहेत.

गॅस दुर्घटना झाल्यास अशा पद्धतीने ग्राहकाला मदत मिळू शकते. परंतु अशा घटना घडू नयेत यासाठी गॅस एजन्सीज किंवा प्रशासन अनेकदा काळजी घेण्याचे आवाहन करत असतं. त्यानंतरही अनेक ठिकाणी गॅससंदर्भात निष्काळजीपणाच दिसून येतो. ज्याचा अनेकवेळा गंभीर परिणाम होऊन अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्राची धाकधूक वाढली, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव

थलायवा रजनीकांत यांनी सोशल मीडियाद्वारे केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा

“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री है”

T-20 World Cup: भारताच्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पाहा गेल्या 24 तासातील दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More