बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात असा असेल पाऊस?, वाचा हवामान खात्याचा अंदाज!

नवी दिल्ली | जुलैमध्ये पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हांमध्ये धुमाकूळ घातला होता. गेल्या काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह बऱ्याच भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे प्रचंड जीवित तसेच वित्तहाणी झाली. अशातच आता भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाज म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर मधील हवामानाच्या अंदाजाची माहिती हवामान खात्याने दिली आहे. देशभरात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. या दोन महिन्यांमध्ये सरासरी 94 ते 106 टक्के इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात सरासरी सामान्य पाऊस पडणार असून दख्खनचे पठार आणि मध्य भारतातही सरासरी सामान्य पाऊस असणार आहे, असं देखील भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाने पहिल्याच वेळी प्रत्येक महिन्याचा स्वतंत्र अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, हवामान खात्याचे मुख्य अधिकारी डॉ. महापात्रा यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हा अंदाज जारी केला आहे. त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ‘या’ आक्रमक खेळाडूकडे दिली कर्णधारपदाची धुरा; विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठा बदल!

नारायण राणेंनी सेना सोडली तेव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते- नितेश राणे

एकीकडे ठाकरे-फडणवीसांची भेट, तर दुसरीकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

‘एक आई म्हणून तुम्हाला विनंती करते…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा झाली व्यक्त!

बाबो! ‘या’ माजी मंत्र्याने केली तब्बल 6 लग्न, पत्नीनेच केला गुन्हा दाखल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More