मुंबई | गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान ते पावसामुळे झालेल्या नुकसानाची तपासणी करत आहेत. नुकसान झालेल्या किती पिकांचे पंचनामे झाले आहेत, त्यातील किती पिकांना नुकसान भरपाई मिळाली आहे. याचा आढावा ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेत आहे. आता त्यांनी वर्धा(wardha) येथे पत्रकार परिषद घेतली आहे, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Goverment) टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी मराठवाडा (Marathwada), कोकण(kokan) आणि पश्चिम महाराष्ट्र(west maharashtra) या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अजुनही येथील काही नागरिकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यावरून मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या अडचणी आणि समस्या कशा समजणार?, अशा शब्दात पवारांनी सरकारला सुनावलं आहे.
पंचनामे करताना घराची भिंत ओली आहे, घर तसेच आहे असं सांगितलं जात आहे. परंतु नंतर भेगा पडून घर पडू शकतं हे आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिले आहे. तसेच काही भागात गॅस सिलेंडर वाहून गेले आहेत. काही मदत सामाजिक संस्थांनी करावी, काही मदत सीएसआरमधून करावी. आम्ही सर्वच जबाबदारी सरकारवर ढकलणार नाही. आम्हीही सरकारमध्ये बराच काळ काम केले आहे, असे पवार म्हणाले.
दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी सध्या पंचनामे सुरू असून, लवकरच सर्वांना नुकसान भरपाई मिळणार आहे. राज्य सरकार सर्व परिस्थीतीवर लक्ष ठेऊन आहे, असे सांगितले आहे.
थोडक्यात बातम्या-
खासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका?, ‘त्या’ निनावी पत्रामुळे खळबळ
‘आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदत नाही’,अजित पवारांचा शिंदे सरकारवर प्रहार
‘…त्यामुळे एकनाथ शिंदेंवर टीका करण्यासारखं काही नाही’ -संजय राऊत
“मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन”
‘अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा’, गोपीचंद पडळकरांची मोठी मागणी
Comments are closed.