बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घाई करा! आगामी काळात सोन्याचे दर दुप्पट होणार, वाचा आजचे दर

पुणे | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

पुणे सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात क्षुल्लक घट झाली आहे. प्रती तोळा सोन्यामागे आज केवळ 10 रुपयांची घट झाली आहे. 10 रुपयांच्या घटीसह 24 कॅरेट सोन्याचा भाव आज पुण्यात 49 हजार 490 रुपयांवर बंद झाला आहे. चांदीचा दरात मात्र आज मोठी वाढ झाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे तब्बल 400 रुपयांची वाढ झाली आहे. 400 रुपयांच्या वाढीसह चांदीचा भाव 68 हजार रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

सध्या जरी सोन्या चांदीच्या दरात क्षुल्लक चढउतार अनुभवायला मिळत असला तरी आगामी काळात या दरांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. अभ्यासकांच्या मते येत्या 3 ते 4 वर्षांमध्ये सोन्याच्या दरात दुप्पट वाढ होऊ शकते. केंद्रीय बॅंका आणि अनेक देशांच्या सरकारांनी तरलतेसह प्रणालीला पूर दिला आहे. याचा परिणाम खूप गंभीर होऊ शकतो, असंही अभ्यासकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

काय सांगता! कुत्रा मागे लागताच रेड्यानी ठोकली धूम, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

‘फडणवीसांचा टॅटू मी ह्रदयावर काढणार होतो पण…’; हातावर टॅटू काढलेल्या नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया

‘पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी होणार की नाही?’; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा हा निर्णय

काँग्रेसला नवीन रणनीतीकार भेटला? सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More