बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवऱ्यानं कापलं बायकोचं ओठ आणि नाक; कारण ऐकून पोलीसही हादरले

नवी दिल्ली | पतीने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचं नाक आणि ओठ कापल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

दारूसाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून नवऱ्याने रागाच्या भरात पत्नीवर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतंय.

पती सकाळपासून रात्रीपर्यंत दारू पितो. संध्याकाळी त्याने दारूसाठी काही पैसे मागितले. तेव्हा महिलेने त्याला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून तो प्रचंड चिडला आणि संतापाच्या भरात धारदार शस्त्राने त्याने नाकावर आणि ओठांवर वार केले, असं या महिलेनं सांगितलं आहे.

बाबूलाल असं पतीचं नाव आहे. बाबूलाल याने महिलेला सोडलं होतं. गेल्या काही दिवसांपासून महिला अन्य एका व्यक्तीसोबत राहत होती. त्या व्यक्तीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर बाबुलाल पुन्हा तिच्यासोबत राहू लागला. दारू पिऊन तो तिला मारहाण करत होता. बाबूलाल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; नवनीत राणांचं अमित शहांना पत्र

तापमान वाढल्यामुळे हिंजवडी परिसरात आग लागण्याचं प्रमाण वाढलं; स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओ!

राज्याचे गृहमंंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार? जयंत पाटील म्हणाले…

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तरूणाला खुलेआम प्रपोज करणं ‘तिला’ पडलं चांगलंच महागात, पाहा व्हिडिओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More