“महिला फक्त बिछाण्यावर झोपण्यासाठीच चांगल्या असतात”

हैदराबाद | महिला फक्त बिछाण्यात झोपण्यासाठीच चांगल्या असतात, असं वादग्रस्त वक्तव्य करणारे प्रसिद्ध तेलुगु अभिनेते चलापती राव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी एका चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यावेळी त्यांनी हे वक्तव्या केलं होतं.

चलापती राव यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात अनेक महिला संघटनांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर सरुनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान, चलापती राव हे खलनायकांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या