बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुशांत तुझी आज आठवण येते”; सारा अली खानने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मुंबई | आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सुशांत सिंग राजपुत (Famous Actoar Sushant singh Rajput) आज आपल्यात नाही. पण त्यानं केलेल्या अनेक चित्रपटांच्या आणि सहकलाकारांच्या अनुभवातून तो आपल्याला सतत आठवत राहातो. अशीच त्याची सहकलाकार आणि बाॅलिवूडची अभिनेत्री सारा अली खानने (Sarah Ali Khan) सध्या एक इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) केली आहे.

सारा अली खानच्या चित्रपट जगतातील अभिनयाची सुरूवात केदारनाथ (Kedarnath Movie) या चित्रपटापासून झाली होती. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतनं अप्रतिम अभिनयानं सर्वांची मनं जिकंली होती. सोबतच सारा अली खानसोबत त्याची केमीस्ट्री चांगली जमली होती. परिणामी सारानं आता तिचा केदारनाथमधील अनुभव शेअर केला आहे.

मला माझ्या मन्सुरची खुप आठवण येते, असं म्हणत सारानं भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. सुशांतचा पाठिंबा, त्याची मदत, सततचे मार्गदर्शन आणि प्रेम यामुळंच मी इथंपर्यंत पोहचू शकले. सुशांत तुझी खुप आठवण येईल, अशी भावनिक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर केली आहे. परिणामी साराची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

दरम्यान, सारानं आपल्या पोस्टमध्ये केदारनाथ चित्रपटातील आठवणी शेअर केल्या आहेत. सध्या सारा आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावत आहे. तिचा आगामी चित्रपट अतरंगी रे हा 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा व्हिडीओ –

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

 

थोडक्यात बातम्या 

राज्यात कडाक्याची थंडी! येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरणार

जमलं बघा! हर्षवर्धन पाटलांची लेक होणार बाळासाहेब ठाकरेंची नातसून

आशिष शेलारांना ‘ते’ वक्तव्य भोवणार; किशोरी पेडणेकरांनी लिहिलं थेट गृहमंत्र्यांना पत्र

“आमचं सरकार येणार हाय, तवा तुम्हाला सुट्टी नाय”

“महाविकास आघाडी म्हणजे Mini UPAचा प्रयोग”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More