बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”

सातारा | गेल्या काही दिवसांपासून ईडी आणि सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय सुडबुद्धीने केला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

मी परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडी आणि इन्कम टॅक्सला देखील घाबरत नाही. माझ्यावर भाजपचं खूप प्रेम होतं. आजही ते माझ्यावर खूप प्रेम करतात, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. मला वाटतं मी त्यावेळी 100 कोटी असते तर बरं झालं असतं. पण त्यांना काहीच कल्पना नाही, मी शरद पवारांचा निष्ठावंत पाईक आहे. मेलो तरी त्यांना सोडणार नाही, असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

साताऱ्यातील कट्टापूरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी भाजपला निशाण्यावर घेतलं. भाजपला, ईडीला, सीडीला कोणी पळवून लावणारे कोणी कार्यकर्ते आहेत, ते आम्ही आहोत. आमच्या सारखे प्रामाणिक कार्यकर्ते परिणामांचा विचार करत नाहीत, असंही शशिकांत शिंदे म्हणाले.

दरम्यान, आपण ईडीच्या बापाला आणि आयकर विभागाच्या बापाला देखील घाबरत नाही, असंही शशिकांत शिंदे म्हणाले. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर देखील निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

सुट्टी नाहीच! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

“अजितदादांनी सांगितल्यामुळे शांत बसलो नाहीतर सोमय्यांचा तोतरेपणा काढला असता”

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More