बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय, काळजी करू नका मी दिलेला शब्द पाळतो”

रत्नागिरी | केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाचं काम केलं आहे. त्यातचं आता मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण आणि शिष्टमंडळाने मुंबई गोवा महामार्गासंबंधात नितीन गडकरींची भेट घेतली आहे. मनोज चव्हाण यांना आश्वासन देताना काँग्रेस राष्ट्रवादीची पाप मी निस्तरतोय, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

यावेळी नितीन गडकरी यांनी कोकणाला लवकरच चांगला रस्ता देण्याचा शब्द दिला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची पाप मी निस्तरतोय. मी कोकणाला लवकरच चांगला रस्ता देणार आहे, असं नितीन गडकरींनी सांगितल आहे. मुंबई गोवा महामार्गावर माझ वैयक्तिक लक्ष आहे, असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

मनसे शिष्टमंडळाला नितीन गडकरींनी काँन्ट्रक्टर बदलणार असल्याचं सांगितलं आहे. ज्यांच्यामुळे हा रस्ता रखडला आहे. त्या दोन काँन्ट्रक्टरला बदलणार आहे, काळजी करू नका, असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. तसेच नितीन गडकरी यांनी चेहऱ्यावरच हसू कायम ठेवून मनसेच्या शिष्टमंडळाला ग्वाही दिली आहे, असं मनोज चव्हाण यांनी सांगितलं.

दरम्यान, विषय समजून घेऊन राजसाहेबांना सांगा, हा विषय मी लवकरच संपवतोय, असं नितीन गडकरींनी शिष्टमंडळाला सांगितलं आहे. आता नितीन गडकरींनी आश्वासन दिल्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचा विषय लवकरचं मार्गी लागेलं असं दिसतंय.

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून मी माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव लिहिलंय’; भाजपच्या माजी खासदाराने सांगितलं गुपित

दोघात तिसरा आता सगळं विसरा! महिलेला चुंबन देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या

राज्यात साथीच्या रोगांचा कहर! ‘या’ जिल्ह्यात आढळले तब्बल 882 रूग्ण

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! प्रियंका गांधींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् चक्क डेव्हिड वार्नरने केला रोहित शर्मावर चोरीचा आरोप!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More