चंद्रकांत पाटलांकडून ‘ही’ अपेक्षा नव्हती- राधाकृष्ण विखे-पाटील

अहमदनगर | महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आमदार राम कदमांची पाठराखण करतील ही अपेक्षा नव्हती, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. नगरमधील काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते.

राम कदमांना निलंबित करणार नाही, तोपर्यंत आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असं विखे-पाटलांनी यावेळी म्हटलं. तसंच कदमांवर फौजदारी कारवाई करुन त्यांना अटक केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, कदमांनी तीन दिवसानंतर माफी मागितली. वास्तविक पाहता त्यांनी जाहीर माफी मागायला पाहिजे होती, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मी राजकीय संन्यास घेणार नाही; 24 तासाच्या आत चंद्रकांत पाटलांची पलटी

…तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे; सुप्रिया सुळेंचा राम कदमांना दम

-राम कदमांनी माफी मागितली, विषय संपला- चंद्रकांत पाटील

-राम कदमांविरोधात गुन्हा दाखल करा, नाहीतर महिला आत्मदहन करतील!

-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचं ‘झंडू बाम वाटप’ आंदोलन

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या