बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यानं मी मुलाला लाॅंन्च केलं नाही’, ‘या’ अभिनेत्यानं केला खुलासा

मुंबई | नेहमीच आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते म्हणजे परेश रावल. अभिनेते परेश रावल यांचा ‘हेराफेरी’ या चित्रपटातील बाबूराव भूमिकेनं तर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अशातच सध्या त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल हा सध्या बॉलिवूडमध्ये येण्याच्या तयारीत आहे. त्याविषयी परेश रावल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. परेश रावलच्या मुलानं नुकतंच ‘बमफाड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मला आदित्यला पैसे खर्च करुन लाँच करायचे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसेही नाही, असं रावल यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं.

इतर सेलिब्रेटींच्या मुलांच्या तुलनेत आदित्यचा डेब्यु हा मोठा नव्हता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना माहिती पडले होते की, तो परेश रावल यांचा मुलगा आहे म्हणून आनंद आणि समाधानाची बाब म्हणजे त्याच्या कामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे मला त्याची फारशी चिंता नाही, असंही रावल यांनी म्हटलं.

दरम्यान, लवकरच परेश रावल हे फरहान अख्तरच्या ‘तूफान’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्याचबरोबर त्यांचा ‘हंगामा 2’ चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Rawal (@aditya___rawal)

थोडक्यात बातम्या – 

राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळणार? केंद्रात हालचालींना वेग

“मतदान घ्या पाहू तुमची ताकद, बहुमत आहे तर मग घाबरता कशाला?”

कोरोनाकाळात आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्यानं ग्रामस्थांनी विकली किडनी अन्….

कोरोना झाल्यानं तरुणानं वाढदिवसादिवशीच उचललं धक्कादायक पाऊल!

काँग्रेस नेत्यांची सायकलवरुन राजभवनाकडे कूच, विविध प्रश्नांवर राज्यपालांना निवेदन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More