मी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य

बंगळुरु | ज्येष्ठ काँग्रेस नेते के एच मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी कर्नाटक विधानसभचे अध्यक्ष रमेश कुमार यांना प्रश्न विचारला असता मी पुरुषांसोबत झोपत नाही असं वादग्रस्त उत्तर दिलं.

काही दिवसांपूर्वी मुनियप्पा यांनी रमेश कुमार आणि आपण पती पत्नीप्रमाणे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही, असं म्हटलं होतं. 

मी कोणासोबतही झोपत नाही. माझी एक पत्नी असून गेल्या दहा वर्षांपासून मी विवाहित आहे. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपण्यात रस असू शकतो, पण माझी तशी कोणतीही इच्छा नाही, असं कुमार यांनी सांगितलं.

दरम्यान, मुनियप्पा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळू नये यासाठी रमेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे. असं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

-मायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे

-मंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या

-“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”

-उदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी