बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला वाटत नाही गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत’; रणजित सावरकरांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | महात्मा गांधीच्या सल्ल्यावरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली, असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. त्यावरुन देशात एकच खळबळ उडाली आहे. यावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला होता. आता याच मुद्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतासारख्या देशाला एक राष्ट्रपिता असू शकत नाही. देशाच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे हजारो लोक असतील, जे आता विस्मृतीत गेले असतील. या देशाला 5 हजार वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे. त्यामुळे देशातील कुठलीही व्यक्ती राष्ट्रपिता होऊ शकत नाही, त्यामुळे मला वाटत नाही की गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत, अशी प्रतिक्रिया रणजित सावरकर यांनी दिली आहे.

सध्या हे लोक चूकीचा इतिहास सादर करत आहेत. जर हे असंच चालत राहिलं, तर ते महात्मा गांधीना हटवून, ज्या सावरकरांवर महात्मा गांधीच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं, त्या सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील, असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते.

दरम्यान, सावरकरांना गांधीजींनी 25 जानेवारी 1920 रोजी पत्र लिहिलं होतं. त्याच्या 6 महिन्यांनंतर गांधीजींनी यंग इंडिया या नियतकालिकामध्ये 26 मे 1920 रोजी सावरकर बंधूंना पाठिंबा देणारा एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये सावरकर बंधू देशभक्त असून त्यांच्यावर केेलेली कारवाई चूकीची असल्याचा संदर्भ गांधीनी त्या लेखामध्ये लिहिला होता. त्यावरून सध्या याबाबत चर्चा सुरू आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रविण दरेकरांनी दिला पार्थ पवारांचा दाखला

फिरसे मौका मौका! भारत-पाकिस्तान सामन्याच्या प्रोमोची तुफान चर्चा; पाहा व्हिडीओ

‘शरद पवार 4 वेळी मुख्यमंत्री होते पण…’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

मोठी बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्स रूग्णालयात दाखल

“शरद पवारांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More