बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुलं जन्माला घालण्यासाठी मी काही यंत्र नाही, मुलं जन्माला नाही घातली तर काय फरक पडतो”

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं असं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. विद्या बालन सिद्धार्थ रॉय-कपूरसोबत विवाहबंधनात अडकली असली तरी तिची जादू मात्र पहिल्यासारखीच आहे. विद्याला आता लग्न झाल्यामुळे काही खासगी प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमुळे विद्या संतापली आणि तिने एका मुलांबाबत मुलाखतीत आपली प्रतिक्रिया दिली होती.

मी मूल जन्माला घालणारं यंत्र नाही. लग्नानंतर वाढलेलं वजन आणि डॉक्टरांकडे काही कारणास्तव जावं लागतं याचा अर्थ असा होत नाही की मी प्रेग्नंट आहे, असं विदया म्हणाली होती. त्यासोबतच खरंच आपल्याकडे लग्न झाले की, मुलं जन्माला घालण्यासाठी असा काही दबाव निर्माण केला जातो तो केवळ वेडेपणा आहे. आधीच जगाची लोकसंख्या ही चिंतेत टाकणारी आहे. त्यात काहींनी जर मुलं जन्माला नाही घातली तर काय फरक पडतो, असंही विदयाने म्हटलं आहे.

माझ्या लग्नाच्याच दिवशी माझ्याच काकांनी मला सांगितले होते की, पुढच्यावेळीस जेव्हा भेटू तेव्हा दोनाचे तीन झालेले असावेत. काकांच्या अशा बोलण्यावर हसूच येत असल्याचं विदयाने सांगितलं.

दरम्यान, लग्न झााल्यावर विद्याने आपल्या नवऱ्यासोबत हनिमुनला कुठे जायचं हेही ठरवलं नसल्याचं विद्याने सांगितलं. माझं लग्न झाल्यापासून सर्व नातेवाईक हाच प्रश्न विचारत आहेत. काळ बदलला तरी माणसिकता बदलली नाही, असं विद्या म्हणाली.

थोडक्यात बातम्या- 

…नाहीतर ही शेवटची चड्डीही काढेन; नाशिकमधील आंदोलनाची देशभरात चर्चा

हार मानेल ती आई कसली! 2 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानं आईनं घेतला ‘हा’ निर्णय

उद्यापासून भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम होणार बंद?; जाणून घ्या

“शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?”

भारतातील कोरोनाचा अनुभव सांगताना ‘या’ क्रिकेटपटूला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More