बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शशिकांत शिंदेंना भाजप 100 कोटींची ऑफर देईल असं मला वाटत नाही’; प्रविण दरेकरांचं शिंदेंना प्रत्युत्तर

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालू आहेत. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपने आपल्याला 100 कोटींची ऑफर दिली होती, असं पुन्हा एकदा म्हटलं आहे.

शशिकांत शिंदे यांनी यापूर्वी देखील हाच दावा केला होता. शिंदे यांनी पुन्हा तोच दावा केल्यानं आता भाजप नेते यावर तीव्र प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. भाजप आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना भाजप शिंदेंना 100 कोटींची ऑफर देईल, असं मला वाटत नसल्याचं म्हटलं आहे.

चर्चेत राहण्यासाठी शिंदे नेहमीच वेगवेगळे स्टंट करत असतात. चर्चेत राहण्यासाठीच शिंदेंनी हा स्टंट केला आहे. भाजप शशिकांत शिंदेंना शंभर कोटींची ऑफर देईल असं मला वाटत नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कटापूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदेंनी भाजप नेत्यांवर तोफ डागलली होती. यावेळी शिंदे यांनी ईडी आणि इन्कॅम टॅक्सला देखील थेट आव्हान दिलं होतं.

थोडक्यात बातम्या –

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

‘आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहिली, तुमचं हे काय चाललंय?’; न्यायालयाने योगी सरकारला फटकारलं

“निवडणुकीत तुम्ही भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देतो”

कोरोनाचा पुन्हा उद्रेक! लसीकरणानंतर देखील ‘या’ देशात पाचव्या लाटेची शक्यता

पीककर्ज घेताय का? असे असतील बँकांचे नवीन निकष; जाणून घ्या सविस्तर माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More