“महाराष्ट्राचा पंंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही”
मुंबई | गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, असं महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील राजकारणातले दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंचाहत्तर वर्षाच्या इतिहासात देशात महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान का झाला नाही?, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर गडकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.
एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला वाटतं. मग त्याची जात, पंत, धर्म कोणताही असो. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे हे मला मान्य नाही, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.
उद्या जर एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल तर, तो पंतप्रधान होईल, त्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच 2 वर्ष पुर्ण होत आहे. त्यांच्यासमोर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पूर, कोरोना, अशी अनेक संकटं कायम आहेत, असंही त्यांनी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, सुरजपासून नाशिक, नाशिकपासून अहमदनगर, अहमदनगरपासून सोलापूर असा महामार्ग तयार केला जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. या महामार्गामुळे मुंबई पुणे महामार्गाचं ट्रॅफिक 50 टक्के कमी होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
हे वेदनादायक आहे, माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत हे कधी पाहिलं नव्हतं- शरद पवार
रानडे इंस्टिट्युटचा वाद शिक्षणमंत्र्यांच्या दरबारी; रानडे इंस्टिट्युटला शनिवारी भेट देणार
कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणानंच; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची होणार सोय
‘लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावलाय’; राज्यसभेतील गदारोळानंतर राऊतांची टीका
Comments are closed.