Top News देश

“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”

नवी दिल्ली | देशात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा पेटलेला आहे. यामध्ये अभिनेत्री कंगणा राणावतने शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या एका आजीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर आजीने कंगणाला आपल्या शेतात कामाला येण्याची ऑफर दिली आहे. यासंबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे.

भटिंडाच्या जंडियां गावातील त्या आजी असून त्याचं नाव महिंदर कौर आहे आणि त्यांचं वय 87 वर्ष इतकं आहे. आजी व्हिडीओमध्ये सांगत आहेत की, माझ्याकडे 13 एकर जमीन आहे. मला 100 रूपयासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कोरोनामुळे काम नसेल तर तु माझ्या शेतात मजुरीला ये, असं महिंदर कौर यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

सरकारच्या भक्तीत मनाला येईल ते बोलत होते. तिला इतकंही माहिती कोणाबाबत काय बोलत आहोत. तिचं जेव्हा मुंबईतील ऑफिस तोडलं तेव्हा तिला पूर्ण पंजाबने साथ दिली होती याची आठवण करून देत पैशांसाठी काम करणारे आम्ही शेतकरी नसल्याचं आजींनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या आजीबद्दल असं ट्विट केलं होतं की, ही महिला 100 रूपयात उपलब्ध आहे. कारण हीच महिला शाहीनबागमध्ये होती आणि हीच शेतकरी आंदोलनात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल माध्यमांवरून टीका होऊ लागल्यावर कंगणाने ते ट्विट डीलिट केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”

“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’”

भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची लागण

“बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच”

टेनिस व्हॉलिबॉल महासंघाच्या मुख्य कार्यकारिणीची निवड, सीईओपदी डॉ. व्यंकटेश वांगवाड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या