Top News देश

“मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू माझ्या मागे लागलेत”

नवी दिल्ली | तेलंगणमधील हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. निकालामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. या पार्श्वभूमीवर एमआयएम मुख्यमंत्री केसीआर यांच्या टीआरएस पक्षाला पाठिंबा देईल का? असा प्रश्न ओवेसींना विचारला गेला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे.

मला भारताच्या राजकारणाची लैला बनवलं आहे आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागले आहेत. वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगूच असं ओवेसी म्हणाले आहेत.

तिहेरी तालक विधेयकावर टीआरएसने सरकारला केंद्र सरकारला पाठिंबा दर्शवला होता. तुम्ही त्या विधेयकाविरोधात होते. अशा परिस्थितीत टीआरएस सोबत जाणं योग्य असेल का? असा प्रश्न ओवेसींना केला गेला. त्यावर ओवेसी म्हणाले की, “तेलंगणात एनपीआर आणि एनआरसी लागू होणार नाही, असं स्पष्ट केलं. टीआरएस धोरण वेगळं आहे, आमचं वेगळं आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा प्रश्न? तर त्याची अधिसूचना येऊ द्या. आम्ही पक्षात चर्चा करू आणि जो काही निर्णय होईल तो जाहीर करू”.

दरम्यान, हैदराबाद महापालिकेत १५० जागांपैकी टीआरएस ५६, भाजप ४८ आणि एमआयएमने ४४ जागा जिंकल्या. महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा ७५ आहे. पण तिन्ही पक्ष बहुमतापासून दूर आहेत. अशा स्थितीत आता सर्वांचं लक्ष एमआयएमकडे आहे.

महत्वाच्या बातम्या-

रेखा जरे हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची घडामोड; आता ही व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात

दिल जीत लिया दिलजीत!; शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी दिले 1 कोटी

“मंत्रिपद गेलं तरी चालेल, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू”

नो मराठी… नो ॲमेझॉन; ॲमेझॉनविरोधात मनसेची नवी मोहीम

“खोटे संदर्भ देऊन कंगणा सतत विष ओकते, तिला रोखलंच पाहिजे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या