मुंबई | महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘राज्यसेवा पुर्व परीक्षा’ पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. यावर आठवड्याभरातच ही परीक्षा घेतली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली त्यानंतर आंदोलनावर पडदा टाकण्यात आलां. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एमपीएससीच्या परीक्षांबाबत प्रश्न विचारण्यात आला.
मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, असं मिश्किल टिप्पणी अजित पवांरानी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज पुण्यात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
एमपीएससीचा विषय आता संपलेला आहे. काल जे काही घडलं ते अत्यंत दुर्देवी होतं आणि विद्यार्थ्यांचा संताप आणि भावना योग्यच आहे. मात्र यावर काहीजण राजकारण करायला बघत आहेत पण राज्य सरकार हे विद्यार्थ्यांसोबतच असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही पण कडक निर्बंध लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्यानं एकवेळ बंद राहणार आहेत. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“मंत्रिपदासाठी पैसे दिलेत, ते वसूल झाल्याशिवाय राजीनामा कसा देईल?”
पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी
भारताची खराब सुरुवात; केएल राहूल पाठोपाठ विराट शुन्यावर बाद
“…तर 100 दिवसात पुण्यातील लोकसंख्येचं लसीकरण होऊ शकतं”
2 फुटी असल्याने लग्न जमेना, थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांनाच म्हणाला; मॅडम…
Comments are closed.