बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो’; चंद्रकांत पाटलांचा मलिकांना टोला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला पहायला मिळत आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि भाजप नेत्यांवर आक्रमकपणे टीका केली आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांवर मोठं वक्तव्य केलं आहे.

वानखेडे माझा जावई नाही. भारतीय जनता पक्षाचा देखील तो जावई नाही. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात काही चाललंय ते चालू द्यावं. मात्र, सर्वसामान्य माणूस वानखेडेंच्या मागे उभा आहे. याची टेस्ट नवाब मलिक यांनी घेऊ नये. हा समाज नेहमी ज्याच्यावर नेहमी अनन्याय होतो आणि अनन्याविरूद्ध बोलणाऱ्यांवर जेव्हा अनन्याय होतो, तेव्हा हा समाज नेहमी पाठिंबा उभा राहतो, हे नवाब मलिक यांनी नेहमी लक्षात ठेवावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

नबाव मलिक उपरोधात्मक टीका करतात त्यांना…, असं म्हटल्यावर चंद्रकांत पाटलांनी तात्काळ उत्तर दिलं. मी त्यांना खिशात ठेवतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत .चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील काही दिवसापासून चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यावरून जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला होता.

थोडक्यात बातम्या-

“काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊच शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल”

न्यूझीलंडविरूद्ध हार्दिक पांड्या खेळणार की नाही?; विराट कोहली म्हणतो…

‘केवळ धर्माच्या आधारावर भेदभाव करणं…’; विराटचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

“आम्ही कलानी आहोत, कलानी कुणाला घाबरत नाहीत”

“माझा देखील आर्थर रोडचा दोन वर्षांचा अनुभव, गृहमंत्री असताना…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More