बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीचा तिसरा डोसही घ्यायला हवा, मी स्वत: घेतला- सायरस पूनावाला

पुणे | कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील अॅन्टीबॉडीज कमी होतात असा रिपोर्ट लॅन्सेटमध्ये छापून आलाय. ते खरं आहे. त्यामुळेच तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा. मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतलाय, असं वक्तव्य सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी केलं आहे.

लसीच्या किमतीत बदल झाल्याने सीरमचा नफा मोठ्या प्रमाणात बुडाला, पण भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केला. सीरमची लस ही जगातील सर्वांत स्वस्त आहे, असं पूनावाला म्हणालेत. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

सरकार वर्षअखेरीस लसीकरण पूर्ण होण्याचं आश्वासन देत आहे. त्यांनी अशा थापा मारणे बंद करावे, असं म्हणत पूनावाला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केली आहे. माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको, पण मी बोलणार आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील 170 देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बील गेट्स फाउंडेशनने पाच हजार कोटी रुपये दिलेत. लसींची निर्यात सुरू केली पाहिजे. अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्यांना लसी पाठवायच्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही- मुंबई सेशन कोर्ट

कोरोनानंतर आता वाढतोय ‘हा’ आजार; शेतकऱ्यांना अधिक धोका

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

सैफचा जहांगीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अरं थांब गड्या नको घेऊ! …अन भारताने दुसराही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More