बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनावर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी मला जामीन देण्यात यावा”

नवी दिल्ली | फसवणूक, खंडणी, बलात्कार अशा विविध आरोपांखाली सध्या तुरूंगवास भोगत असलेला स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला महात्मा गांधी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच आसाराम बापूने कोरोना उपचारासाठी राजस्थान हायकोर्टाकडे बेलची मागणी करण्याबाबत याचिका दाखल केली आहे.

आसाराम सध्या कोविड पॉझिटिव्ह असून जोधपूरच्या एम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र आपल्याला यावर आयुर्वेदिक उपचार घ्यायची इच्छा असल्याचं त्यानं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

कोरोनावर उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी आसारामने राजस्थान हायकोर्टाकडे केली आहे. आसारामच्या जामीन याचिकेवर 13 मे रोजी राजस्थान हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आसारामचे वकील प्रदीप चौधरी यांनी सांगितलं की, सोमवारी कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती यामध्ये आसारामची शिक्षा रद्द करुन अंतरिम जामीन देण्यात यावा ही मागणी करण्यात आली.

आसारामला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या आठवड्यात बुधवारी मथुरादास मथूर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला शुक्रवारी एम्स रुग्णालयात हालवण्यात आलं. जोधपूर तुरुंगात असलेल्या इतर 12 कैद्यांसह आसारामलाही कोरोनाची लागण झाली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर…’; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली! राज्यपालांना निवेदन, लवकरच पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री

झोपेत असताना काळाचा घाला! झोपेतच नवरा-बायकोचा होरपळून दुर्दैवी मृृत्यु

…तेव्हा आमचाही जीव तुटतच असेल ना!; डॅाक्टरच्या पत्नीचं काळजाला हात घालणारं पत्र

मालदीवमध्ये कोसळलेल्या रॉकेटबाबत वॉर्नरने सांगितला थरारक अनुभव, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More