बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करुणा शर्मा आता राजकारणाच्या आखाड्यात, केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत असलेल्या करूणा शर्मा आता राजकीय आखाड्यात उतरणार आहेत. याबाबत स्वत: माहिती दिली आहे. करूणा शर्मा यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची भेट घेतली.

मी समाजसेविका असून राजकारणातही येईल. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असं करूणा शर्मा म्हणाल्या. स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन त्या महापालिकेत आल्या होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंमधील असलेल्या नात्यावर जाहीरपणे बोलण्यास नकार दिला.

गेली 25 वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या 2 महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेल, असं करूणा शर्मा म्हणाल्या.

दरम्यान, अतिरीक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉम सारख्या अॅप्लीकेशनविरोधात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ असतात त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही करूणा शर्मा यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा- चंद्रकांत पाटील

मुंबईचे नवे आयुक्त हेमंत नगराळे कोण आहेत?; आतापर्यंत केलीय ‘ही’ जबरदस्त कामगिरी

‘पुरावा असेल तर…’; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनेलच्या 2 संचालकांना अटक

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 2 हजार पार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More