बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मोदींना आमंत्रित करण्यात आलं आहे. मोदी बांगलादेशमध्ये दाखल झाल्यावर त्यांना बंदुक आणि तोफांची सलामी देण्यात आली. बांगलादेशच्या आयोजित कार्यक्रमात मोदींनी बांगलादेशच्या स्वातंत्रलढ्याच्या आठवणींनी उजाळा दिला.

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी 20 ते 22 वर्षांचा असेल. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. तेव्हा मलाही अटक झाली होेती ते माझं पहिलं आदोलन असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या 50 व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आलं. या गौरवशाली सोहळ्यात मला सहभागी होता आलं हे माझं भाग्य समजत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. तर बांगलादेश आणि भारतातील संबंध आणखीन दृढ होतील. येथील नागरिकांचे मन आणि विश्वास दोन्ही भारताने जिंकले आहे. बांगलादेशला 20 लाख कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला तर या कठीण प्रसंगात इतरही देशांच्या पाठीशी भारत उभा राहिला होता. जर यापुढेही बांगलादेशला कोरोना लस पुरवली जाईल, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या संकटानंतर नरेंद्र मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. बांगलादेशच्या या कार्यक्रमावेळी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनीही मोदींचे कौतुक केलं. पूर्व सीमेबाबत भारत निश्चिंत आहे. कारण भारतासोबत बांगलादेश उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे कोरोनासारख्या महामारीशी लढण्यासाठी मदत मिळाली, असं अब्दुल मोमेन म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

‘उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीची वाढ होतेय’; ममता बॅनर्जींचा मोदींवर निशाणा

नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही- रमेश चेन्निथला

निकिता तोमर हत्याकांडाचा निकाल; एकाची निर्दोष मुक्तता तर दोघांना दिली ‘ही’ शिक्षा

‘या’ कारणामुळे महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का?- अतुल भातखळकर

राहुलचा शतकी तडाखा, भारताचं इंग्लंडला 337 धावांचं आव्हान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More