बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फडणवीसांचा टॅटू मी ह्रदयावर काढणार होतो पण…’; हातावर टॅटू काढलेल्या नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टॅटू हातावर काढल्यामुळे भाजपच्या समीप असलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या उजव्या हातावर नरेंद्र पाटील यांनी देवेंद्र असं नाव कोरलं आहे. हातावर फडणवीसांचं नाव कोरल्यानंतर आता नरेंद्र पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना माथाडी कामगारांसाठी अनेक कामे केली आहेत. ते एक डायनॅमिक नेते आहेत. खरंतर त्यांचं नाव मी ह्रदयावर कोरणार होतो. परंतु किती त्रास होतो हे पाहून पुढचं ठरवू यामुळे मी अगोदर त्यांचं नाव हातावर कोरलं, असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

माझ्या हातावरील टॅटू पाहून फडणवीस माझ्यावर रागावले. मात्र, मी त्यांना म्हणालो की साहेब मी तुमचा कार्यकर्ता आहे आणि नेत्यांना कार्यकर्त्यांचे हट्ट पुरवावे लागतात, असं देखील पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी शिवबंधन तोडत भाजपचा झेंडा हाती घेतला होता.

थोडक्यात बातम्या –

काँग्रेसला नवीन रणनीतीकार भेटला? सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार!

‘नवाब मलिकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ‘तो’ ठराव रद्द करावा’; भाजप नेत्याचं मलिकांना आव्हान

“राज्यपालांचे वर्तन दुर्दैवी, ते भाजप नेता म्हणून आरएसएससाठी काम करत आहेत”

संसदेत पेगॅसस प्रकरणावरून गदारोळ, राज्यसभेच्या अध्यक्षांनी TMCच्या खासदारांना केलं निलंबित

शहा आणि पवारांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?, संजय राऊत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More