बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक बातमी! Omicron बाबत आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोना (Corona) महामारी आटोक्यात आली असं वाटत असतानाच सध्या कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरियंटनं सर्वांना चिंतेत टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्राॅनच्या Omicron in South Africa) रूग्णांची संख्या वाढत आहे. अशातच भारतातही (India) ओमिक्राॅनचे 4 रूग्ण आढळल्यानं सर्वत्र चिंता पसरली आहे. ओमिक्राॅनचा (Omicron) प्रसार हा वेगानं होत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.

ओमिक्राॅनच्या विषाणूची पसरण ही अतिशय वेगानं होत असल्यानं तो अधिक धोकादायक नाही, असं मत आयसीएमआरं व्यक्त केलं आहे. आयसीएमआरनं (ICMR) कोरोना विषाणूच्या वाढीवर आणि प्रसारावर संशोधन केलं आहे. तो जास्त वेगानं पसरत असल्यानं त्याचा धोका जास्त नाही, असं आयसीएमआरला शास्त्रीय संशोधनातून समजलं आहे.

ओमिक्राॅनला घाबरण्याची गरज नाही मात्र काळजी घेणे सुद्धा तीतकंच महात्त्वाचं आहे, असं मत आयसीएमआरचे प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. समीरण पांडा यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि इतर व्हेरियंटचा अभ्यास केल्यानंतर आयसीएमआरला काही महत्त्वपूर्ण बाबी समजल्याचं पांडा म्हणाले आहेत. परिणामी नागरिकांनी भिती न बाळगता काळजी घ्यावी.

दरम्यान, ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत असल्यानं सध्या लसीकरणावर जास्त भर देण्यात येत आहे. सौम्य असलेल्या रूग्णांमध्ये संसर्गाचा वेग जास्त असतो. सध्या ओमिक्राॅन झपाट्यानं पसरत आहे हे मात्र नक्की.

थोडक्यात बातम्या 

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राज्यात आढळला Omicronचा पहिला रूग्ण

“…मग हा हट्ट कशासाठी?”, नाराजी व्यक्त करत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

तेजस्विनी पंडीत म्हणते ‘लिपस्टिक बॅन’, चाहत्यांना पडला प्रश्न

“महाराजांच्या दरबारात शायरी व्हायची म्हणतात, ‘मुजरा’ व्हायचा म्हटले नाही हे नशीब”

Ajaz Patelची ऐतिहासिक कामगिरी! अनिल कुंबळे आणि जीम लॅकर यांच्या विक्रमाशी बरोबरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More