बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप, सुशांत सिंह राजपूतचाही केला उल्लेख

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Datta) आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तीने आज इंस्टाग्रामवर( Instagram) एक पोस्ट केली आहे. त्यात अनेक लोक तिचा छळ करत असून तिला टार्गेट करत आहेत. त्यात तिने नाना पाटेकरांवर (Nana Patekar) अनेक आरोप  केले आहेत. तसेच बॉलिवूड (Bollywood) माफिया यांच्यावरही आरोप केले आहे. खोट्या बातम्या पसरविणाऱ्या पत्रकारांचाही तीने पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.

तनुश्री दत्ताने तिच्या पोस्टमध्ये  स्पष्ट म्हटले आहे की, मला काहिही झालं तर त्याला जबाबदार नाना पाटेकर, त्यांचे वकिल, त्यांचे सहकारी आणि त्यांचे बॉलिवूडमधील माफिया मित्र जबाबदार असतील. हे माफिया कोण तर, ज्यांची सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput) प्रकरणात  नावे समोर आली होती ते सर्व, असंही तिने म्हटले आहे.

त्यांचे चित्रपट पाहू नका, सर्वजण त्यांच्या मागे लागा. त्यांचे आयुष्य नरक बनवा. कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. कायदा आणि न्यायव्यवस्था अपयशी ठरली असली तरी माझ्या या महान देशाच्या नागरिकांवर विश्वास आहे, असं ती म्हणाली आहे. तिच्या या पोस्टमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. आता यावर नाना पाटेकर किंवा इतर बॉलिवूड मंडळी काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, तनुश्री दत्ताच्या म्हणण्यानुसार, 2009 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी नाना पाटेकरांनी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी तिने 2018 मध्ये नाना पाटेकरांवर MeToo हॅशटॅग आरोप केला होता. त्यावेळीही सर्वांना धक्का बसला होता.

थोडक्यात बातम्या-

“उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या समस्या कशा समजणार?”

खासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका?, ‘त्या’ निनावी पत्रामुळे खळबळ

‘आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदत नाही’,अजित पवारांचा शिंदे सरकारवर प्रहार

‘…त्यामुळे एकनाथ शिंदेंवर टीका करण्यासारखं काही नाही’ -संजय राऊत

“मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More