बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लोणीचोरी ही कृष्णलीला असेल तर मिठाईचोरी हा गुन्हा कसा?’; न्यायाधिशांचा निकाल चर्चेत

हरनौत | बिहारच्या हरनौत जिल्ह्यातील एका महिलेने अल्पवयीन मुलाविरुद्ध फ्रीजमधील मिठाई आणि मोबाईल चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. किशोर न्याय परिषदेच्या मुख्य न्यायाधिशांनी अवघ्या 15 दिवसांत या प्रकरणावर सुणावणी करत त्या मुलाची निर्दोष सुटका केली आहे. तसेच लोणीचोरी ही कृष्णलीला असेल तर मिठाईचोरी हा गुन्हा कसा? असा सवाल देखील न्यायाधिशांनी यावेळी उपस्थित केला आहे.

आरा जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगा हरनौत जिल्ह्यातील त्याच्या आजोळी गेला होता. या मुलाच्या मामाच्या शेजारील एका महिलेने या मुलावर मिठाई आणि मोबाईल चोरी केल्याचा आरोप केला. यानंतर 23 सप्टेंबरला न्याय परिषदेचे मुख्य न्यायदंडाधिकारी मानवेंद्र मिश्रा यांच्या कोर्टात या प्रकरणावरील सुणावणी झाली. यावेळी हा मुलगा प्रचंड घाबरला होता. न्यायाधिशांना आपल्या घरची हालाखीची परिस्थिती सांगताना या मुलाला यावेळी अश्रू अनावर झाले.

यानंतर सुणावणी करताना न्यायाधिश म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत हंडी फोडणे आणि लोणी चोरणे या कृष्णाच्या लीला म्हणून सांगितल्या जातात. परंतु आज त्याच भारतात भुकेमुळे मिठाई चोरण्याला गुन्हा मानला जातोय. न्यायाधिशांनी कृष्णलीलेचा दाखला देत या मुलाची निर्दोष मुक्तता केली.

तसेच लहान गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा नोंदविणे टाळा आणि लहान मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला देखील यावेळी न्यायधिश मानवेंद्र मिश्रा यांनी यावेळी दिला आहे. न्यायाधिशांच्या या निकालाची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे.

थोडक्यात बातम्या –

एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा ‘इतक्या’ हजारांची पेन्शन

काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी; भाजप खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारलं, पाहा व्हिडीओ

बसल्या बसल्या त्याने चोरी करुन पळणाऱ्या चोराला पकडलं, पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहा यांनी बैठक बोलावली

कोणताही क्लास न लावता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशवंतने UPSC केली क्रॅक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More