महाराष्ट्र मुंबई

केबल फुकट देता तर, पेट्रोल -डिझेलही फुकट द्या; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई | सरकारने डिजिटल इंडिया सुरु केलं आहे. त्यामुळे केबलही फुकट देण्याच्या घोषणा होत आहेत, जर तुम्हाला केबल फुकट द्यायचे असेल तर तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

जिओ फायबर सेवेमुळे केबल व्यवसायावर मक्तेदारी निर्माण होत असून केबल व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जात अाहे, त्यामुळे केबल मालक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

दरम्यान, पंचवीस-तीस वर्ष कष्ट करुन बसवलेला व्यवसाय एखाद्या घोषणेमुळे एकदम बंद होत असेल तर असं मी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-विजू मामांचा मृत्यू; सचिन कुंडलकर आणि जितेंद्र जोशीमध्ये जुपंली

-राजू शेट्टींमुळेच दुधाला भाव मिळाला; खडसेंकडून शेट्टींचं अभिनंदन

-नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक!

-‘सोनी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 2018 मधील वेगळा ठरू शकतो हा चित्रपट

-मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका, बेकार शाप लागेल- महादेव जानकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या