पुणे महाराष्ट्र

जर काँग्रेसनं सन्मानानं उमेदवारी दिली तर पुण्यातून लोकसभा लढणार- संजय काकडे

पुणे | जर काँग्रेसनं सन्मानानं उमेदवारी दिली तर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार, असं भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. ते ‘न्यूज18 लोकमत’शी बोलत होते.

भाजपसाठी तन-मन-धन देऊन काम केलं तरी देखील माझा विचार होत नाही, असं देखील संजय काकडे यांनी म्हटलं आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाची लढत पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट विरुद्ध संजय काकडे अशी व्हावी, असंही संजय काकडे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजप किंवा काँग्रेसनं लोकसभेसाठी उमेदवारी दिली नाहीतरी 2020 पर्यंत राज्यसभेवर असून पुढं देखील राहीन, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी तयार; विद्यमान खासदारांना मिळणार संधी?

5 मिनिटांच्या भेटीत राफेलवर एकदाही चर्चा झाली नाही; मनोहर पर्रिकरांनी लिहलं पत्र

धक्कादायक! महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी झाडल्या गोळ्या

पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंना केला फोन

-काँग्रेसला राम जन्मभूमीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या