Top News महाराष्ट्र राजकारण सातारा

‘या’ गावात सरपंच झाला की माणूस मरतोच म्हणायचे; महिलेनं घेतला धाडसी निर्णय!

सातारा | गावच्या राजकारणात सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असते. त्यासाठी भांडणं , मारामाऱ्या , खून एवढंच काय तर भावकी भावकीमधील संबंध देखील बिघडतात, पण महाराष्ट्रातील एका गावात मात्र सरपंचपद म्हटलं की लोक नको नको म्हणायचे, याला कारण होतं अंधश्रद्धा…

पुरोगामी महाराष्ट्रात साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावात गेल्या 20 वर्षापासुन सरपंचपद अंधश्रद्धेमुळे रिक्त होते. सरपंचपदावर बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो, अशी अंधश्रद्धा या गावात होती, त्यामुळे या पदावर बसण्याचं धाडस कोणी करत नव्हतं.

अखेर एका महिलेनं यासाठी पुढाकार घेत, ही अंधश्रद्धा असल्याचं दाखवून दिलं आहे. शितल विश्वास राजपुरे असं या महिलेचं नाव असून त्यांनी स्वतः पुढं येत गावच्या सरपंचपदाची जबाबदारी घेतली आहे. गावाला सरपंच मिळणार असल्याने गावाकऱ्यांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला.

दरम्यान, सरपंचपद महिलेला आरक्षित असल्याने शितल यांना अडचणीचा सामना करावा लागला नाही. शितल यांच्या निर्णयाचं आता संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डाॅ. हमीद दाभोळकर यांनी या गावाला भेट देऊन धाडसी सरपंच शितल राजपुरे यांचा सत्कार केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पोलिसांची धडक कारवाई, 10 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या!

गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

‘इथलेच काय इंटरनॅशनल डॉनही मला ओळखतात, घाबरायचं नाही’; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

शेतकऱ्याच्या पोराची कमाल, नोकरी सोडून घरच्या छतावर करून दाखवली केसरची शेती

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, ‘त्या’ मंत्र्याचे फोटो व्हायरल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या