Top News देश

हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा- मोहन भागवत

नवी दिल्ली | हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा. कारण ते त्याच्या मुळातच आहे. तो झोपलेला असू शकतो त्याला उभं करावं लागेल. मात्र कुणीही हिंदू भारत विरोधी असू शकत नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

‘मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ नावाच्या  इंग्रजी पुस्तकाच्या विमोचन मोहन भागवत बोलत होते.

महापुरुषांना कुणीही आपल्या सोयीनुसार परिभाषित करू शकत नाही. हे पुस्तक व्यापक संशोधनावर आधारलेले आहे. ज्यांचं मत यापेक्षा वेगळं असेल तेदेखील संशोधन करून लिहू शकता, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जोपर्यंत मनात ही भीती असेल की तुमच्या असल्याने माझ्या अस्तित्वाला धोका आहे. आपल्याला माझ्या असल्याने आपल्या अस्तित्वाचा धोका वाटेल तोपर्यंत सौदे तर होऊ शकतात पण आत्मीयता निर्माण होऊ शकत नसल्याचं भागवत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

गूड न्यूज! भारताकडून सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

वर्षाचा पहिला दिवसच ठरला शेवटचा; काळजाचा थरकाप उडवणारी घटना!

“नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करत आहेत”

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो”

लता मंगेशकर यांचं ठाकरे कुटुंबाला उद्देशून ट्विट; ट्विटमध्ये म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या