मुंबई | एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. आता नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपासोबतच, ट्विटरवॉर सुरू आहे. महाराष्ट्रात असता तर पोलिसांनी कोणत्याही बिळातून फरफटत आणलं असतं. म्हणूनच गुवाहाटीला जाऊन बसले आहेत, असं वक्तव्य करत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही शिंदे गटावर हल्लाबोल केलाय.
ज्यादिवशी हे बंडखोर आमदार मुंबईत शिवसेना भवनात दाखल होतील. त्यांना एअरपोर्टवरून हलू दिलं जाणार नाही. 72 तासापेक्षा जास्त वेऴ विमानतळाला घेराव घालण्यात येईल, असा धमकीवजा इशाराच सुभाष देसाई यांनी दिला.
जेव्हा जेव्हा कोणी शिवसेनेविरूद्ध बंड केलं त्यांचा पराभव झालेला आहे. आता एकनाथ शिंदेंही असंच तोंडावर पडतील, असा दावा सुभाष देसाई यांनी केला आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली जाते; तेव्हा तेव्हा शिवाजी महाराजाच्या तलवारीची धारही शत्रूच्या मनात भीती निर्माण करते. अशात बंडखोर आमदार मुंबईत यायला घाबरणार नाही तर काय होईल? असा सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केला.
सुभाष देसाई यांच्या या आरोपावर शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार?, पहावं लागणार आहे. सध्या शिंदे गटाच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे.
थोडक्यात बातम्या
शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार?; महत्त्वाची बातमी समोर
शिंदे गटाला मोठा धक्का?, वकिलांनी दिला गंभीर इशारा
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल का?, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
“मी कुठेही गेलो नाही, मला मंत्रीपदाची हाव नाही, शिवसैनिक हेच आमच्यासाठी मोठं पद”
“शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर देण्यात आली होती पण, बाबा ओरडतील म्हणून नाही आला”
Comments are closed.