बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोटांगण घातलं असतं”

मुंबई |  आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. उद्धव ठाकरे या महापुजेसाठी काल स्वत: आठ तास ड्रायव्हिंग करत पंढरपुरात दाखल झाले होते. यावरून राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडायला सुरूवात केली आहे.

शनिवार 17 जूलै रोजी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे चेंबूरमध्ये काही घरांवर संरक्षक भिंत कोसळली. त्यामध्ये जवळजवळ 17 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी येऊन सर्व परिस्थितीचा आढावा घ्यायला हवा होता, असं मत विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र उद्धव ठाकरे त्याठिकाणी आले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जातेय.

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. शनिवारी ड्रायव्हिंग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चेंबूर येथे आले असते, तर त्यांच्यासमोर लोटांगण घातलं असतं, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

दरम्यान,  जो टिपू से करते है प्यार, वो विठ्ठू माऊली को क्यू करे नमस्कार?, असंही ट्विट करत अतुल भातखळकर यांनी विठ्ठल-रूक्मिणीची पूजा करण्यावरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीचं आता लय टेंशन घेऊ नका, कारण…

गंदी बात!, ‘या’ अभिनेत्रीमुळे पोलिसांना सापडला राज कुंद्रा!

शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं आता काही खरं नाही; होऊ शकते ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा

“बा विठ्ठला…. जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे”

“उठा उठा आषाढी आली, स्वबळावर गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More