बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील मशिदी बंद करा; जावेद अख्तर यांची मागणी

नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या. मात्र अजुनही काही मुस्लीम बांधव नमाजासाठी एकत्र येत असल्याचं दिसून येत आहे. यावर देशातील सर्व मशिदी बंद करण्याची मागणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केली आहे.

कोरोना महामारीचे संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद कराव्यात, असा फतवा दारूल उलूम देवबंद यांनी काढावा अशी मागणी अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांनी केलीय. ताहिर महमूद यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. करोनाच्या संकटामुळे जर काबा आणि मदीनातील मशिदी बंद होत असतील तर भारतातील मशिदी का बंद होत नाहीए?, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

इस्लामचे तज्ज्ञ आणि अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांच्या वक्तव्या आधार घेत यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

दरम्यान,  दारूल उलूमची इमारत आयसोलेशन वॉर्डसाठी साठी वापरता येईल, असं देवबंदचे मौलाना मुफ्ती अबुल कासिम नोमानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका पत्रात लिहिलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबई पालिका आयुक्तांचा ‘तो’ निर्णय मंत्री नवाब मलिकांनी मागं घ्यायला लावला

मुकेश अंबानींकडून तब्बल इतक्या कोटींची मदत; महाराष्ट्रासह आणखी या राज्यालाही केली मदत

महत्वाच्या बातम्या-

‘सरकार एकटं नाही लढू शकणार’; कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘नाम’चा मदतीचा हात

‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा, काटकसरीने वागा- शरद पवार

कोरोनाचा सामना करण्यासाठी रामदेव बाबांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More