बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’; खासदार सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं

मुंबई | स्थानिकांच्या विरोधानंतर देखील पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. या घटनेवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. या घटनेवर पुणे महापौरांनी उत्तर द्यावं. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. शरद पवार साहेबांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे. मात्र त्यांनी नवी नियमावली यांनी काढली आहे, अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावरची कारवाई ही जाणून बुजून केली जात आहे. एखादा मोठा पक्ष देशात ऐवढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. आता या टीकेवर भाजप काय उत्तर देईल याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“अनिल देशमुखांची काही दिवसांनी तुरूंगात रवानगी होणार”

“हातात होतं तेव्हा केलं नाही अन् आता तुम्ही म्हणताय 4 महिन्यात करतो”

इंजिनीयरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; उदय सामंत यांनी केली मोठी घोषणा

धक्कादायक! मुंबईत 2053 लोकांना बनावट लस; उच्च न्यायालयाने व्यक्त केली ही काळजी

अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे, सुप्रिया सुळे संतापल्या, भाजपवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More