बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लस घेतली नाही तर…’; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

चंदीगड | कोरोनानं गेल्या दीड वर्षापासून लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसली तरी बऱ्यापैकी निर्बंधामध्ये शिथिलता पहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा जमाव करायला सुरुवात केली आहे. अशातच या संकटातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी एकमेव शस्त्र आहे. ते म्हणजे लसीकरण. त्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणविषयी जागरुकता निर्माण केली जात आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लसीकरण मोहिम जोर धरुन आहे. मात्र यातच काही जण अजूनही लसीकरण करण्यास समोर येत नाहीत. लस घेण्यास नकार देत आहेत. कोरोना लस घेतली नाही तर सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल, असा मोठा निर्णय पंजाब सरकारनं घेतला आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी लसीकरणासंदर्भात बोलताना हा कठोर निर्णय जारी केला आहे. पंजाब सरकारचे कर्मचारी जे वैद्यकीय कारणाशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे कोरोना लस घेणार नाही अशा लोकांना 15 सप्टेंबर नंतर सक्तीच्या रजेवर पाठवलं जाणार आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलं गेलेलं लसीकरण आणि त्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या लसींच्या साठ्यात कोणाताही कमीपणा केला नाही. यावर त्यांनी समाधानही व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –  

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी!

मुंबई बलात्काराच्या घटनेनं हादरली, अत्यंत अमानुष घटना उघड

नितेश राणे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र, म्हणाले….

‘पहिल्यांदा हेल्मेट घालून विकत घेतलं होतं कंडोम’, ‘या’ अभिनेत्यानं सांगितला मजेशीर किस्सा

“नात्यांचे संदर्भ बदलत असतात, अगोदर महागाई चेटकीण वाटायची आज ती प्रेयसी झालीये”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More