बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सत्ता आली तरी तुम्ही आम्ही कोण तर कपबश्या धुणारे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानं दिला घरचा आहेर

जालना | मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असताना आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या पेटताना दिसत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारला घेरलं आहे. त्यातच आता ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मागासवर्गिय कल्याणमंत्री विजय वडट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. जालन्यातील एका सामाजिक मेळाव्यात विजय वडेट्टीवर बोलत होते.

सत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कपबश्या धुणारे! चहा पिणारे नाही. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्ही खावा भजा! अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजावर खूश? तुम्ही आम्ही कुठे आहोत, याचा विचार आपण करत नाही, असं वक्तव्य विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या ताटातलं काढायला शिकाल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने ओबीसी मजबूतीने पुढे येईल, असं देखील वडेट्टीवर यांनी म्हटलं आहे.

ओबीसी समाजासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रोज लढताना दिसतात. ते माझं कौतुक देखील करताना दिसतात. मी देखील त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मिळून लढू. नाहीतर काय शिवसेना सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण आणि भाजप सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण हे सर्वांनाच माहिती आहे. सत्ता आल्यानंतर पहिल्या बाकावर कोण बसणार हे सर्वांना मााहिती आहे. तेव्हा तुम्ही कुठे आहात?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कालच नारायण राणे म्हणाले की, आम्ही वेटिंगवर आहोत. हे जर वेटिंगवर असतील तर काँग्रेसवाले ऑक्सिजनवर आहेत, असंही ते वडेट्टीवार म्हणाले. आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी याआधी दिला होता.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोदी सरकारचं कौतुक; काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

‘…अन्यथा पैसे काढता येणार नाहीत’; पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये- उद्धव ठाकरे

चिंताजनक! आता डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना अधिक धोका

महाविकास आघाडीची महत्वाची बैठक; तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांची हजेरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More