औरंगाबाद | लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं एकत्र यावे. त्याशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे, असं केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
युतीच्या सत्ता सुत्रानुसार ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असेल. त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असावा, अशी तडजोड होऊ शकेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, केंद्रात कॅबिनेट आणि महाराष्ट्रातही एखादे मंत्रिपद देऊन सेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. शिवसेना जर भाजपसोबत राहिली नाही, तर त्यामध्ये सेनेचेच नुकसान होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-भाड्याची माणसं आणलीत!!! अन् शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले…
-…तर भाजप सरकारने हा नराधमी प्रयोग करुनच पहावा- शिवसेना
-कोकणातच नव्हे तर देशात माती खायला लावू; शिवसेनेचा भाजपला इशारा
-निरंजन डावखरेंच्या विजयामुळे राष्ट्रवादीचं ते स्वप्न अखेर अपूर्ण!
-अखेर कोकणात भाजपचेच ‘डाव’खरे; तब्बल 23 तासांनी लागला निकाल