बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माची अद्दल घडेल’; हसन मुश्रीफांचा पलटवार

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यावर आरोपांची खैरात करताना दिसत आहेत. किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांनी गैरव्यवहार करून संपत्ती कमावली आहे, असा आरोप सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यावर केला होता. त्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप नाकारत मुश्रीफ यांनी सोमय्यांचा निषेध केला होता. मुश्रीफ यांची मागील 4 दिवसांपासून प्रकृती बिघडली आहे. मुश्रीफ यांच्यावर सध्या मुंबईच्या बाॅम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या आधी मला थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरू असताना ताप वाढत असल्याचं माझ्या निदर्शनास आल्यामुळं मी तात्काळ बाॅम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. डॉक्टरांनी मला डेंग्यू सदृष्य तापाचे निदान असल्याचं सांगितलं आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या हे स्टंटबाजी करत आहेत. ही स्टंटबाजी कशासाठी? सोमय्यांना हा अधिकार कोणी दिला? सोमय्या फक्त तक्रार करून पर्यटन प्रसिद्धी मिळवत आहेत. विनाकारण बदनामी करण्याचा प्रकार सोमय्या करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात माझ्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत. विनाकारण, शिळ्या कढीला उत आणला जात आहे. यामध्ये काळा पैसा असल्याचे सिद्ध झालं तर मी कोणतीही शिक्षा भोगीन. अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माचीच अद्दल घडेल, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्या 20 वर्षाच्या मंत्रीदाच्या काळात माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला नाही. मी घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर जाहीर काय तर, दबक्या आवाजात सुद्धा चर्चा झाली नाही, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मुश्रीफ यांनी एक पत्र त्यांच्या फेसबुकवरून प्रसारित केलं आहे. त्यामध्ये त्यांनी या सर्व प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

वाचा पत्र –

 

थोडक्यात बातम्या –

पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री

…अन् जयंत पाटलांनी पुर्ण केली ‘त्या’ 6 वर्षाच्या चिमुकल्याची इच्छा

शब्दालय प्रकाशनच्या ‘पुस्तकवारी’ पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

‘आमची सत्ता आली तर…’; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री?; थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More