बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर आम्ही उरलेले दोन पक्ष एकत्र राहू”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल, असं पटोले सातत्याने सांगत आहेत. पटोेले यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील तीन चाकी सरकारमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे.

अशातच आज संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पटोलेंच्या या वक्तव्यावर टोला लगावला आहे. सगळेच स्वबळावर लढत असतील तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राच्या हिताचा विचार करुन एकत्र लढावं लागेल, असं संजय राऊत यांनी सामनामधून म्हटलं आहे.

आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राऊतांच्या सुरात सुर मिसळला आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र राहण्यास सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र, काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील. सामनाने तसं मत व्यक्त केलं आहे आणि महाराष्ट्रातील जनतेची देखील तशीच इच्छा दिसत आहे, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, पटोलेंच्या वक्तव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आतापासूनच वर्तवली जात आहे. कारण भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अगोदरंच भाजप स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं आहे आणि आता नाना पटोले देखील सातत्याने स्वबळाची भाषा करतात.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क – पुणे प्रशासन

सरकारच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास मासिक पेन्शनची हमी

महाराष्ट्रातील ‘या’ तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

‘भीती कोरोनाची वाटायला हवी, लसीची नाही’, क्लिनिकल ट्रायलसाठी आलेल्या मुलांचा विश्वास

‘नवरा बायको भांडतात… नंतर एकत्र चहा पितात’; सेना-भाजप राड्यावर पाटलांचं सूचक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More