बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा आरक्षण बैठकीला सरकार तयार होत नसेल तर…’; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई |  मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजतर्फे सरकार विरोधात मुक आंदोलन केली जात आहे. या आंदोलनाचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आहे. अलिकडेच मराठा समाजाचं नांदेड या ठिकाणी मुक आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

नांदेड या ठिकाणी आम्ही न बोलवता सुद्धा 50 ते 70 हजार लोकं जमली होती. आवाज उठवायचा म्हटलं तर मी तेही करू शकतो. जर सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो. नांदेड फक्त एक झलक होती, तीही न सांगता. मग सांगून बघू का? मग बघा, अशा शब्दात संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

सरकारने जर ठरवलं तर आम्ही बैठकीला बसण्यासाठी तयार आहोत. पण सरकार तयार नसेल तर आम्ही रायगडवर मुक आंदोलन करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेलं पत्र आम्हाला मान्य नाही, तसेच त्यासंदर्भात त्यांनी याची पुरेशी दखलही घेतली नाही आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नांदेडमध्ये झालेल्या आंदोलनात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झालं होतं. त्यामुळे मराठा समाजातील 21 जणांवर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणाबाबत संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला होता.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सहा पिकांच्या MSPमध्ये वाढ

धक्कादायक! तालिबान्यांच्या भीतीने देश सोडून गेलेल्या नागरिकांना ‘या’ शेजारी राष्ट्राने हाकललं

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने, संपुर्ण महाराष्ट्रांचं लक्ष!

“राज्यात मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री भ्रष्टाचारी, काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहेत”

करूणा शर्मांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More