“बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी”
मुंबई | पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तडकाफडकी बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजप आक्रमक झालं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
‘बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?’, असा शेर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. यामधून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं असून मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी आणखी किती बळी जाणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रूपये वसूल करण्यास सांगितले होते असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. ‘टाईम्स नाऊने’ दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्टाँरंट आणि अन्य आस्थापनांमधून 100 कोटी रूपये जमा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.
दरम्यान, गेल्या 13 महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकं कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आणि त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्याकडे होमगार्डची जबाबदारी देण्यात आली.
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021
थोडक्यात बातम्या –
परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामध्ये घेतलं शरद पवारांचं नाव; म्हणाले…
लाँच झालेल्या मेड इन इंडिया काॅम्पॅक्ट एसयूव्ही Skoda Kushaqचे जाणून घ्या फिचर्स
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण
‘ती खरंच गरीब आहे का?’; सायली कांबळेला गरीब दाखवल्याने ‘इंडियन आयडल 12’ वादाच्या भोवऱ्यात
Comments are closed.