महाराष्ट्र मुंबई

धनंजय मुंडे प्रकरणात आता व्हिडीओ क्लिप्स; पीडितेच्या वकिलाचा धक्कादायक दावा

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या वकिलांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे.

तक्रारदार महिलेने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला असून त्यादरम्यान त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पोलिसांबाबत नाराजी वर्तवली आहे.

उच्च स्थरीय लोकांना तक्रार केल्यानंतर मुंडेंनी याबाबत खुलासा केला. रेणूविरोधात ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत करोडो रुपयांची खंडणी उकळण्याबाबत खोटे आरोप केले आहेत, असं त्रिपाठी यांनी म्हटलंय.

माझ्या अपक्षकाराची काहीच संपत्ती नाही. ती स्वतः पीजीमध्ये राहते, त्याचे भाडे 10 हजार ते 15 हजार आहे. त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नाही, उदरनिर्वाहासाठी त्यांनी दागिने देखील विकले. तसेच असे व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि खूप गोष्टी आहेत, ते उघड झाल्यानंतर लोकांची तोंडं बंद होतील, असा इशारा त्रिपाठी यांनी मुंडेंना दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर माझाही धनंजय मुंडे झाला असता; ‘या’ मनसे नेत्याचा धक्कादायक गौप्यस्फोट

मनसेच्या ‘या’ नेत्यालाही रेणू शर्मांचा फोन; कृष्णा हेगडेंचा खळबळजनक दावा

‘धनंजय मुंडेंची रेणू शर्माच्या कुटुंबियांना धमकी’; रेणू शर्माच्या वकिलांचा गंभीर आरोप

“धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग त्यांना लगेच फासावर चढवायचं का?”

“करुणा आणि रेणू शर्मा दोघीही एकाच घरात राहतात, मग मोठी बहीण का बोलत नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या