बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना व्हायरसची तिसरी लाट आलीच तर ऑक्सिजन कमी पडणार नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा, तालुक्यात रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची नर्मिती करण्यास सांगितलं आहे. मात्र नव्याने प्लांट सुरू करायचं असेल तर त्याला काही वेळ लागतोच. मात्र कोविडची तिसरी लाट आलीच तर ऑक्सिनज कमी पडणार नाही. तशी तयारी आपण केली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

तिसरी लाट येणार असं तज्ञ सांगत आहेत. तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही. त्यासाठी सरकारनं कंबर कसली आहे. उद्योजकांना तिसऱ्या लाटेची तयारी करायला सांगितली आहे. काही जण लॉकडाऊनला विरोध करत होते, मात्र लॉकडाऊन लावलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

तिसरी लाट आली तरी त्याचे एवढे घातक परिणाम होऊ द्यायचे नाही, यासाठी सरकारने कंबर कसली आहे. दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल याची कोणालाच कल्पना नव्हती. तिसऱ्या लाटेत अर्थचक्र थांबता कामा नये. मी कामगार वर्गाच्या युनियन लिटरशी बोललो आहे. त्यांनी काय करायला पाहिजे याची मी त्यांना कल्पना दिली आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

राज्याला रोज 50 हजार इंजेक्शनची गरज मात्र केंद्राकडून फक्त…- उद्धव ठाकरे

लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही- उद्धव ठाकरे

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

महामंडलेश्वर भागवतानंदगिरी महाराज यांचे निधन, नुकतेच कुंभमेळ्यावरुन परतले होते

“रोहित सरदाना खोटारडा होता, तो कुणाच्याही लक्षात राहणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More