बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझा मुलगा तिथं असल्याचा पुरावा मिळाला तर मी…’; अजय मिश्रा यांचं खुलं आव्हान!

नवी दिल्ली |  उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली. या घटनेत अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यामुळे आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली . त्यानंतर पोलिसांनी आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावर आता केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी जाहीर आव्हान केलं आहे.

लखीमपूर खीरी येथे अजय मिश्रा यांच्या मालकीच्या कारने शेतकऱ्यांना धडक दिली. त्यामध्ये एक गाडी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारासंबंधित माझा मुलगा आशिष मिश्रा याच्याविरोधात कोणतेही पुरावे समोर आले तर मी राज्यमंत्रीपदाचा देईल, असं अजय मिश्रा यांनी सांगितलं आहे.

लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यृ झाला आहे. अजय मिश्रा यांनी असा दावा केला आहे, त्यांचा मुलगा आशिष मिश्रा हा हिंसाचार घडून आला तेव्हा तो दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो पुरावे देखील आहेत. परंतु शेतकरी संघटनांनी असं म्हटलं आहे की मंत्र्यांच्याच मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली आहे. या घटनेची पुढील चौकशी आता पोलीस करत आहेत.

दरम्यान, लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारासंबंधित अनेक राजकीय नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. काॅंग्रेससह अन्य इतर पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध देखील व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! 36 तासांच्या नजरकैदेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना अटक

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला धुळ चारत बच्चू कडूंची जिल्हा बँकेत बाजी

“जो अख्ख जहाज खरेदी करु शकतो त्याला ड्रग्ज विकायची काय गरज?”

‘ही घटना तर जालियनवाला बागची पुनरावृत्ती’; लखीमपूर घटनेवरून शरद पवारांचा हल्लाबोल

शाहरुखच्या मुलाआधी ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More