Top News महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीमाना द्यावा- भाजप

मुंबई | कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले आहेत.  मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

ठाकरे सरकारला मेट्रो कारशेड जागा अधिग्रहणाचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागायला हवी. ज्यांच्यामुळे अतिरिक्त खर्च वाढवणार आहे. त्याचबरोबर उशिरही होणार आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरेंनीही राजीनामा दिला पाहिजे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

कांजूर कारशेड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले. तसेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान,  मी पण 30 वर्षांपासून राजकारणात आहे. पण मी कधीही विकासकामात राजकारण आणत नाही. आम्ही मदतच करत असतो. पण हा निर्णय खूपच जिव्हारी लागलेला दिसतोय आणि त्यामुळेच केंद्राने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारला धक्का! कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

“गप बसून उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?”

नवरीसारखा श्रृंगार करत आपल्या पोटच्या मुलांसोबत महिलेने केलं धक्कादायक कृत्य!

“राज्यातील दोन दिवसाचं अधिवेशन आठवं आश्चर्य तर केंद्राने रद्द केलेलं अधिवेशन हे कितवं आश्चर्य”

चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या